काँग्रेसनेते सचिन सावंतांना ट्विटरवर धमकी ; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 17:54 IST2019-06-26T11:55:02+5:302019-06-26T17:54:15+5:30
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

काँग्रेसनेते सचिन सावंतांना ट्विटरवर धमकी ; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन
मुंबई - काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर व्यंगात्मक ट्विट केले होते. त्यानंतर भाजपचे समर्थक म्हणून घेणाऱ्यांनी सचिव सावंत यांना ट्रोल करताना अपशब्दांचा वापर केला. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमाकवले. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
राज्य काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी २१ जून रोजी एक व्यंगात्मक ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले. तसेच धमकावण्यात आले. या संदर्भात विरोधीपक्ष नेते विजय वेडेट्टीवार यांनी झिरो हवर्समध्ये हा प्रश्न उपस्थित केला. तसेच धमकवणाऱ्या आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मंत्र्यांचे नाव घेऊन सचिन सावंत यांच्यावर टीका करण्याला कुठली 'लोकशाही' म्हणता येईल ? #MaharashtraLegislativeAssembly#CONGRESS#MAHARASHTRA@INCMaharashtrapic.twitter.com/2F1JlDSwVf
— Vijay Wadettiwar (@WadettiwarVijay) June 25, 2019
गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे ट्रोलींग करणाऱ्यांना अजिबात पाठिशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट करताना संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश सायबर क्राईमला देणार असल्याचे सांगितले. मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच राज्य सरकार याला रोखण्यासाठी कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.