मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या अंडरवर्ल्डच्या लोकांना भेटायला जायच्या असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तर शिवसेने हे वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा त्यांना पश्चाताप करावा लागेल असा इशारा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.
लोकमतने घेलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी अंडरवर्लविषयीच्या आठवणी सांगितल्या. अंडरवर्ल्डमध्ये आता किरकोळ लोक आहेत. दाऊद इब्राहिमला मी पाहिलेलं आहे. त्याला दमही दिलेल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव होता, असंही सांगितले. छोटा शकील, दाऊद हे ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे, अंस राऊत यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी एक गौप्यस्फोट केला. करिमा लाला याला भेटायला इंदिरा गांधी यायच्या असं संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राऊत यांना उत्तर देताना निरुपम म्हणाले की, राऊत यांनी छोट्या-मोठ्या शेरोशायरी करून राज्याचे मनोरंजन करावे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
तर संजय राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा शिवसेनेला पश्चाताप करावा लागेल असा इशारा सुद्धा यावेळी संजय निरुपम यांनी दिला आहे. त्यामुळे राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेले वक्तव्यावरून शिवसेना- काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.