शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
3
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
4
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
5
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
6
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
8
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
9
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
10
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
11
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
12
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
13
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
15
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
16
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
17
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
18
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
19
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
20
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!

रेल रोको आंदोलनातून काँग्रेस नेते गायब

By admin | Published: June 27, 2014 12:34 AM

काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सारी शक्ती एकवटून देशभरात रेल रोको आंदोलन केले. नागपुरात मात्र या आंदोलनात काँग्रेसचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार व प्रदेश पदाधिकारी

आमदार, खासदारांसह प्रदेश पदाधिकाऱ्यांचीही पाठ नागपूर : काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सारी शक्ती एकवटून देशभरात रेल रोको आंदोलन केले. नागपुरात मात्र या आंदोलनात काँग्रेसचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार व प्रदेश पदाधिकारी फिरकले नाहीत. या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे प्रदेश काँग्रेसचे निर्देश होते. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या आदेशाचाही अनादर केला. २५ जून रोजीच्या रेल रोको आंदोलनात आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, प्रमुख नेते, आघाडी संघटनांचे प्रमुख, सेल व विभागांचे अध्यक्ष यांनी सहभागी व्हावे, असे पत्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना प्राप्त झाले होते. मात्र, त्याची नेत्यांनी दखल घेतली नाही. खा. अविनाश पांडे, माजी खा. विलास मुत्तेमवार, आ. दीनानाथ पडोळे, माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी, काही नगरसेवक आंदोलनात सहभागी झालेच नाहीत. केंद्रात सरकार हातून गेले, आता आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला हाताशी धरण्याची असलेली संधीही काँग्रेस नेते गमावत आहे. असेच सुरू राहिले तर विधानसभेतही जनता हात दाखविल्याशिवाय राहणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रसला नागपूर शहरात सहापैकी फक्त दोन जागा जिंकता आल्या. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार पटापट आपटले. आता लोकसभेच्या निवडणुकीत तर जनतेने भाजपला एकतर्फी कौल दिला. सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपला भरभरून आघाडी मिळाली. ही लीड पाहता काँग्रेसचे नेते भानावर येतील, जनतेशी संपर्क वाढवतील, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतील, आंदोलनांमध्ये सहभागी होतील,अशी अपेक्षा होती. मात्र, ठेच लागल्यानंतरही नेते चूक सुधारायला तयार दिसत नाही. आमचे नेते फक्त लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मागण्यासाठी, तिकीट मिळाल्यावर प्रचार संपेपर्यंतच सक्रिय असतात. पक्षाने दिलेला कार्यक्रम राबविण्यात, आंदोलनात सहभागी होण्यास त्यांना रस नसतो, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)