ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - काँग्रेस नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांचा मुलगा अजिंक्य पाटीलने मुंबईत वरळी येथे १०० कोटी रुपयांना ट्रीपल डयुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला आहे. अलीकडच्या काळातील मुंबईतील हा सर्वात मोठा मालमत्ता खरेदीचा व्यवहार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सी फेस व्ह्यू असलेल्या या २३ मजली इमारतीत अजिंक्यने आलिशान घर खरेदी केले आहे. मुंबईत महागडया घरांची खरेदी मंदावलेली असताना हा व्यवहार झाला आहे. हा व्यवहार गेमचेंजर ठरेल असे रिअॅलिटी व्यवसायात काम करणा-यांचे म्हणणे आहे.
पाटील यांच्या एआयपीएस रिअल इस्टेट या कंपनीमार्फत वरळीत ही घर खरेदी करण्यात आली आहे. या घराची मूळ किंमत ९५.४ कोटी रुपये असून, स्टॅम्प डुयूटीपोटी ४.७ कोटी भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. २२, २३ व्या मजल्यासह २१ व्या मजल्यावरील काही भाग पाटील यांनी विकत घेतला. हा टेरेस फ्लॅट आहे. कंपनीचे प्रवक्ते दीलीप कावाड यांनी या व्यवहाराची पृष्टी केली.