शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
3
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
4
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
5
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचं संदीप नाईकांना सूचक इशारा
6
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
7
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
8
NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
9
'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न
10
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
11
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच
12
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
13
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
14
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
15
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
16
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
17
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
18
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
19
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
20
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक

By admin | Published: July 11, 2017 12:17 PM

मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
सिंदुधुर्ग, दि. 11 - मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. 
येथील मच्छिमारांच्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य कार्यालयात गेले होते. यावेळी नितेश राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. तसेच, नितेश राणे यांनी  सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. दरम्यान, याप्रकरणी मालवण पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई केली असून त्यांना थोड्याच वेळात कुडाळ सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी  सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना बेकायदेशीर पर्ससीननेटच्या मासेमारीवर केव्हा कारवाई करणार? असा सवाल केला. पारंपरिक मच्छिमारांचे जीवनच धोकादायक स्थितीत असताना बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. तसेच १ आॅगस्टपासूनच्या नव्या मत्स्य हंगामात समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील, असा सज्जड दमही नितेश राणे यांनी भरला होता.
(नीतेश राणेंनी फेकली अधिकाऱ्यांवर ‘मासळी’)
(नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांच्या अंगावर फेकले मासे)
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, रापण संघाचे पदाधिकारी दिलीप घारे, श्रमिक मच्छिमार संघाचे छोटू सावजी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, देवगड काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप साटम, अमोल तेली, संभाजी साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, किरण टेंबुलकर, बाळा खडपे, भाई खोबरेकर, तुषार पाळेकर, ज्ञानेश्वर खवळे, सचिन आरेकर, प्रदीप खोबरेकर, गणेश कुबल, गुरुनाथ तारी, अमोल जोशी, संदीप कांदळगावकर, प्रकाश राणे, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, नगरसेविका ममता वराडकर, चारुशीला आढाव, चारुशीला आचरेकर, अभय कदम, महेश जावकर, संजय लुडबे, बाळू कोळंबकर, घनश्याम जोशी, कृष्णनाथ तांडेल, राजू बिडये, सूर्यकांत फणसेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

पर्ससीन मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना आमदार नीतेश राणे यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्त वस्त यांच्याकडून कोणतीच उत्तरे न मिळाल्याने नितेश राणे चांगलेच आक्रमक बनले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून दाखविला जात असलेला शासन निर्णयच फेकून देत पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यावर केसेस दाखल झाल्या तरी त्या घेण्यास मी समर्थ आहे, असे स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांचे अनेक प्रश्न मांडत अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.

आयुक्तांच्या टेबलावर मासळी ओतली...

पर्ससीननेट मासेमारी बंद करण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलावर बांगडा मासळीची टोपली ओतली. यावर आयुक्त वस्त यांनी ही मासळी पकडण्यास मी सांगितले का? असे वक्तव्य केल्याने संतप्त आमदारांनी टेबलावरील मासळी त्यांच्या अंगावर भिरकावली. मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसेल तर यापुढे आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करू,असा इशारा दिला.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...

१ आॅगस्टपासून अनधिकृत पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई केली जाईल. दंडाची रक्कम वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल. अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या नौकांचा परवाना रद्द केला जाईल असे लेखी आश्वासन मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिले. त्यानंतर नितेश राणे यांनी आंदोलन मागे घेतले.

नीतेश राणेंसह शंभरजणांवर गुन्हा...

पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर बांगडा मासळी फेकल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन मच्छिमारांना अभय देत मत्स्य अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप आमदार राणे यांनी करत मत्स्य आयुक्तांवर मासळी फेकली होती. मत्स्य आयुक्तांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजप मच्छिमार सेलचे रविकिरण तोरसकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाई मांजरेकर, छोटू सावजी, दिलीप घारे यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.