ऑनलाइन लोकमत -
सिंधुदूर्ग, दि. ५ - डंपर मालक संघटनेच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात आली आहे, कोरोस पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या डंपर मालक संघटनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून सामांनाची तोडफोड केली तसंच पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली होती. यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत जखमी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा डंपर मोटर मालक-चालक संघटनेच्यावीने शनिवारी सकाळपासून ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कठोर नियम लावले असल्याने या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन शुक्रवारपासून सुरू झाले आहे.