माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:44 PM2019-08-03T14:44:13+5:302019-08-03T16:24:09+5:30
वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात कधीही झालं नाही, असं पक्षांतर पाहायला मिळत आहे. एकट्या राष्ट्रवादीतून आतापर्यंत २० हून अधिक नेते सत्ताधारी पक्षात गेले असून आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच अनेक नेत्यांच्या बाबतीत अफवाही पसरविली जात आहे. मात्र एका महिला काँग्रेस नेत्याने या आफवा पसरविणाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे.
माजीमंत्री आणि काँग्रेसनेत्यावर्षा गायकवाड या लवकरच पक्षांतर करणार असलेल्या चर्चा काही दिवसांपासून मुंबईत सुरू आहे. त्यांच्या धारावी मतदार संघातही अनेकजन चार दिवसांत वर्षा गायकवाड पक्षांतर करणार असून पक्ष माहित नसल्याचे ठामपणे सांगत होते. गायकवाड यांनी २०१४ च्या मोदी लाटेत देखील आपली आमदारकी शाबूत राखली होती. परंतु, त्याच आता पक्षांतर करणार यामुळे काँग्रेसची खात्रीलायक जागा जाणार अशी चर्चा सुरू होती.
दरम्यान इच्छुकांच्या मुलाखतीत, वर्षा गायकवाड उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पाठबळ मिळाले होते. मात्र यावर खुद्द वर्षा गायकवाड यांनीच प्रतिक्रिया दिली. आजारी असल्यामुळे आपण मुलाखतीला जावू शकलो नाही, असं त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस माझ्या रक्तातच आहे. माझ्या घरात काँग्रेसची परंपरा आहे. शेवटपर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे गायकवाड यांनी ठणकावले. तसेच आपल्या पक्षांतराच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे.