“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:11 PM2023-06-02T14:11:53+5:302023-06-02T14:13:04+5:30

सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अशी विचारणा करण्यात आली आहे.

congress nana patole asked what is the adani pm modi relationship and where did 20 thousand crores come from | “अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

googlenewsNext

Nana Patole: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. ३० मतदारसंघात भाजपच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतले जाईल, असे नाना पटोले म्हणाले.

अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले?

उद्योगपती अदानी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांच्या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही. अदानी व काँग्रेसची वयैक्तिक वैर नाही. परंतु आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत. मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत?  अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. मोदी सरकार ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरदाराच्या पोराला राजा बनण्याची वेळ आली त्यावेळी याच लोकांनी महाराजांची गत काय केली होती हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारे होते. कोण त्याचा राजकीय फायदा उठवत असेल तर छत्रपतींच्या मावळ्यांना त्यातील बारकावा कळतो. महाराजांना ज्यांनी त्रास दिला तो त्रास मावळे विसरलेले नाहीत, सरसंघचालकांच्या विधानावर यापेक्षा जास्त चर्चा करण्याची गरज वाटत नाही, असेही पटोले म्हणाले.


 

Web Title: congress nana patole asked what is the adani pm modi relationship and where did 20 thousand crores come from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.