“जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढतोय, भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार”; काँग्रेसचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:20 AM2024-04-04T09:20:11+5:302024-04-04T09:22:17+5:30

Congress Nana Patole News: भिवंडी, सांगली व मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आताही आग्रही आहे. काँग्रेसने ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

congress nana patole claims that india alliance will defeat bjp in lok sabha election 2024 | “जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढतोय, भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार”; काँग्रेसचा निर्धार

“जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढतोय, भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार”; काँग्रेसचा निर्धार

Congress Nana Patole News: ‘गॅरंटी’ हा शब्दही राहुल गांधी यांनी आधी प्रचारात वापरला, कर्नाटक विधानभा निवडणुकीवेळी काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्यावर जनतेने विश्वास टाकला व सत्ता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे तसेच तेलंगणातील जनतेनेही काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास टाकला. आता देशभरातील जनतेसाठी काँग्रेसने ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. भाजपाचा अपप्रचार खोडून काढणे व काँग्रेसच्या गॅरंटीचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भिवंडी, सांगली व मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आताही आग्रही आहे. यासाठी सामोपचाराने व चर्चेतून मार्ग काढला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच इंडिया आघाडीचा निर्धार आहे त्यासाठी सर्व मित्र पक्षांनी काम केले पाहिजे. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतली असून इंडिया आघाडीवर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, एमएसपीचा कायदा, जीएसटीमुक्त शेती, तरुणांसाठी ३० लाख रिक्त जागा भरणे, शिक्षित तरुणांना प्रशिक्षण व वर्षाला १ लाख रुपये, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याची गॅरंटी देण्यात आली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला, यातूनच काँग्रेस पक्षाने ५ न्याय व २५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा संकल्प जाहीर केला असून राज्यात घरोघरी जाऊन हा संदेश पोहचवला जाईल, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.
 

Web Title: congress nana patole claims that india alliance will defeat bjp in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.