Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:24 PM2021-06-02T22:24:57+5:302021-06-02T22:26:46+5:30
Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole criticised bjp over obc and maratha reservation)
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.
नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले
भाजप खोटे बोलण्याचे काम करतेय
राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरू आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असे ते म्हणाले. तसेच भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला
आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी
भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली होती.
“उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिले.