“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:42 PM2022-08-23T17:42:57+5:302022-08-23T17:45:02+5:30

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

congress nana patole criticize bjp devendra fadnavis and eknath shinde govt over farmer compensation | “शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

googlenewsNext

मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. परंतु एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे अत्यंत दुर्दैवी या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने गावे उद्ध्वस्थ झाली आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, जनावरे वाहून गेली आहेत. अशी परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. विरोधी पक्ष नात्याने आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत पण सरकार शेतकरी प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचेही प्रावधान नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने आज मंत्रालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने काल आत्महत्या करून आयुष्य संपवले. शेतकऱ्याला मंत्रालयलाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत आहे. शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये कोरवाहूसाठी तर बागायती तसेच फळबागासाठी हेक्टरी १.५ लाख रुपये दिले पाहिजेत या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, रायगडच्या समुद्रात शस्त्रात असलेली एक बेवारस बोट सापडली तर ट्रॅफिक हवालदाराच्या व्हॉट्सऍपवर मुंबईवर हल्ला करणारा मेसेज येतो हे गंभीर आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे, पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत  आहेत, राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे असेही पटोले म्हणाले.
 

Web Title: congress nana patole criticize bjp devendra fadnavis and eknath shinde govt over farmer compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.