“श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:06 AM2023-06-20T09:06:02+5:302023-06-20T09:11:48+5:30

चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

congress nana patole criticized and demand to ban on adipurush movie | “श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

“श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

googlenewsNext

Adipurush Controversy: बिग बजेट असलेला आणि मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेलेला आदिपुरुष चित्रपटावरून देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर देश-विदेशात निर्माण झालेल्या गदारोळामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे देशभरात निदर्शने होत असताना विरोधी पक्षांनाही त्यांच्यावर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. शेजारी राष्ट्र नेपाळने सर्व भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे, तर हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे. यातच आता श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला, अशी मागणी करण्यात आली आहे. 

काँग्रेसकडूनही आदिपुरुष चित्रपटावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आदिपुरुष चित्रटातून श्रीराम व हनुमान यांचा अपमान करण्यात आला आहे. भाजप हिंदुत्वाचे सरकार असल्याचा डांगोरा पिटते आणि श्रीराम व हनुमानाचा अपमान करणारा चित्रपट येतो पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद देण्यात आले आहेत. चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय? श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंद घालावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात वाद झाल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. चित्रपटाचे संवाद पुन्हा लिहिण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) यावर योग्य ती कार्यवाही करत आहे. चित्रपटातील संवाद व अन्य वादग्रस्त गोष्टींवर आक्षेप घेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांतील काही भागांत लोक रस्त्यांवर उतरले व त्यांनी निदर्शने केली.  


 

Web Title: congress nana patole criticized and demand to ban on adipurush movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.