“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:31 PM2023-07-07T14:31:07+5:302023-07-07T14:34:17+5:30

Congress Vs PM Modi Govt: भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.

congress nana patole criticized bjp and pm modi over corruption and inflation | “भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”

“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”

googlenewsNext

Congress Vs PM Modi Govt: भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू  लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपच्या सत्तापिपासू राजकारणावर चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली. 

नरेंद्र मोदी व भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे

नरेंद्र मोदी व भाजप भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिनलेला आहे. कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते व त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन भाजप पक्षाची ताकद वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.

भाजप सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही

समृद्धी महामार्गावर बस अपघातात २६ लोक होरपळून मेले त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपाच्या लोकांना लाज वाटली नाही. भाजप सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. भाजपचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात विविध आंदोलने करणार आहे. भाजपचा खरा चेहरा उघडा करणार आहे, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

दरम्यान, काँग्रेसबद्दल भाजप जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु असतानाही अशाच बातम्या पेरल्या होत्या, आताही अफवा पसरवल्या जात आहेत पण काँग्रेस पक्षातून कोणीही जाणार नाही. सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीतून बिभीषण प्रवृत्ती गेली ते बरेच झाले असे स्पष्ट करुन नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्षाबरोबर जे पक्ष येणार त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.


 

Web Title: congress nana patole criticized bjp and pm modi over corruption and inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.