“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 06:28 PM2024-09-15T18:28:40+5:302024-09-15T18:29:31+5:30

Congress Nana Patole News: काँग्रेस मविआ सरकार सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करू. तसेच २.५ लाख रिक्त सरकारी पदे भरली जातील, अशी गॅरंटी नाना पटोलेंनी दिली.

congress nana patole criticized bjp mahayuti and central govt over old pension scheme | “जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”

“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”

Congress Nana Patole News: जुनी पेन्शन योजना ही काँग्रेसच्या काळात सुरु होती. अटल बिहारी वाजपेयी सरकारने बंद केली आहे. भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात आहे तेथे जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाभ्रष्ट युती सरकारने महाराष्ट्र १० वर्षे मागे नेला व केंद्रातील मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कारभारानेही देशाची व राज्याची पिछेहाट झाली. महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी सर्व योजना लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचा-यांची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

शिर्डी येथील पेन्शन राज्य महाअधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते. आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेस आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा शब्द नाना पटोले यांनी दिला.

जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचा-यांचा हक्क आहे

जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचा-यांचा हक्क आहे, तुमचाच पैसा निवृत्तीनंतर तुम्हाला दिला जातो, सरकार काही उपकार करत नाही परंतु जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्याची तिजोरी रिकामी होईल असे भाजपा सरकार म्हणते. उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते त्यावेळी सरकारची तिजोरी रिकामी होत नाही का? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. 

दरम्यान, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण महायुती सरकार ती पदे भरत नाही. काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर ही रिक्त पदेही भरली जातील. काँग्रेसचे सरकार असताना विलासराव देशमुख यांनी गाव वस्तीवर शाळा सुरू करुन गाव खेड्यातील गरीब कुटुंबातील मुला मुलींपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकार जिल्हा परिषदेच्या या शाळा बंद करत आहे. सरकार MPSC मार्फतची नोकर भरती करत नाही उलट त्या विद्यार्थांवर पोलीस लाठीचार्ज करून त्यांचे आंदोलन दडपून टाकले, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 
 

Web Title: congress nana patole criticized bjp mahayuti and central govt over old pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.