Nana Patole : आम्हाला हजारो मतांच्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून आणायचंय म्हणून... - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:35 PM2022-10-13T14:35:42+5:302022-10-13T14:45:01+5:30

Congress Nana Patole : "ऋतुजा लटके यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय सोनिया गांधी यांचा आहे. देशात आणि राज्यात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याच्याशी एकत्र होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही."

Congress Nana Patole slams BJP And Shinde Fadnavis Government Over Politics | Nana Patole : आम्हाला हजारो मतांच्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून आणायचंय म्हणून... - नाना पटोले

Nana Patole : आम्हाला हजारो मतांच्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून आणायचंय म्हणून... - नाना पटोले

googlenewsNext

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत आहे. अवघा एक दिवस शिल्लक असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा महापालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरुन ऋतुजा लटके यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. लटके यांच्या याचिकेवर आज सुनावणी सुरू असून हायकोर्टानं मुंबई महापालिकेला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत आज दुपारी अडीच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"ऋतुजा लटके यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय सोनिया गांधी यांचा आहे. देशात आणि राज्यात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याच्याशी एकत्र होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी तिथे आम्हाला हजारोंच्या फरकाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे आणि ही आमची जबाबदारी आहे, त्या ताकदीने आम्ही तयारी करत आहोत" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सध्या राज्यात ईडीचं सरकार आहे. हे ईडीचं सरकार घाबरट असून, राज्याच्या जनतेसाठी नाही तर गुजरातसाठी काम करते. सध्याचं सरकार हे गुजरातसाठी काम करते म्हणून राज्यातील वेदातांसारखे प्रकल्प गुजरातला गेले. मुंबईत लोकलमध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र या सरकारने पहिले बुलेट ट्रेनला मान्यता दिली, कारण काय तर गुजरातचा फायदा झाला पाहिजे" असं म्हणत नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.

"ईडीचं भाजपा सरकार हे दिल्लीतील 2 आकांच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे. घाबरट सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. यातून ऋतुजा लटके यांचा राजीनामा न घेण्यासाठी दबाव टाकला गेल्याची शक्यता" असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांना निवडणूक लढवण्याआधी पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Congress Nana Patole slams BJP And Shinde Fadnavis Government Over Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.