Maharashtra Politics: “५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:18 PM2023-02-14T19:18:53+5:302023-02-14T19:20:09+5:30

Maharashtra News: BBCने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर ITच्या धाडी पडू लागल्या, असे सांगत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले.

congress nana patole slams modi govt after income tax department action at bbc office in delhi | Maharashtra Politics: “५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका

Maharashtra Politics: “५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: BBCच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयसोडून घरी जाण्यास सांगण्यात आले. यानंतर आता या कारवाईवरुन विरोधक आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावरुन टीका केली आहे. 

बीबीसीवरील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले. काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे, असे ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निशाणा साधला आहे. 

५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले

नाना पटोलेंनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, BBC ने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर IT च्या धाडी पडू लागल्या. ५६ इंचाच्या छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले, अशी खोचक टीका पटोलेंनी केली. दुसरीकडे, नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. बीबीसीच्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. बीबीसीने गुजरात दंगलीसंदर्भात एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यात, देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानी चे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे, असे ट्विट करत अमोल मिटकरींनी टीका केली. तसेच या ट्विटसह जागो भारतवासी असा हॅशटॅग दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress nana patole slams modi govt after income tax department action at bbc office in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.