मुंबई - महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला. आम्ही नव्या टीम सोबत काम करण्यास आता पुन्हा एकदा तयार असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही राज्यातून भुईसपाट केले असल्याचे महाजन म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ते वृत्तवाहिन्याना प्रतिकिया देताना बोलत होते.
एक नव्या दमाची टीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. या नवीन मंत्र्यांचा महाराष्ट्राला आणि त्यांच्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. तेसच पुढील येणाऱ्या निवडणुकीला भाजपला याचा फायदा होणार असल्याचे महाजन म्हणाले. तर याचवेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा टीका केली, लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला भुईसपाट केले असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
आयात केलेल्या लोकांना संधी दिली जात असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाला सुद्धा महाजन यांनी यावेळी उत्तर दिले. राजकरणात सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. लोकसभा निवडणुकीत आम्ही पक्षात नवीन लोके घेतली, पण त्यामुळे अनपेक्षित निकाल लागला. खडसे साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी असे म्हणणे आश्चर्य वाटते. खडसे यांनी सुद्धा जळगावमध्ये नवीन लोकांना घेतले आणि त्यांना तिकीट दिलीच होती. असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना उत्तर दिले.