काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकारणाला स्वत:चा ठेका समजला; अमित शहा
By appasaheb.patil | Published: September 1, 2019 09:58 PM2019-09-01T21:58:13+5:302019-09-01T22:00:39+5:30
सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याच्या समारोप.
सोलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे. सामान्य युवकांना अधिकार नाही का? यांनी राजकारणाला स्वत:चा ठेका समजला आहे असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.
सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, अजित पवारांनी ७४ हजार कोटींचा घोटाळा केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ हजार कोटींमध्ये २२ हजार गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणलं. विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना घोटाळा केला. शहीदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला. आम्ही आजपर्यत एक रुपयांचा घोटाळा केला नाही, असेही ते म्हणाले.
विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे फक्त लॉलीपॉप दाखवत होते. मात्र आम्ही जलपूजन करत कामाला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारकाचे काम सुरु केले आहे असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी देखील ३७० विरोधात मतदान केलं, सोलापूरच्या जनतेने त्यांना उत्तर विचारायला हवं असेही शहा यांनी शेवटी सोलापूरकरांना आव्हान केले़