शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ओढवून घेतले आव्हान!

By admin | Published: February 17, 2017 1:03 AM

कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय म्हणजे कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटा-तटाचे, कुरघोड्यांचे राजकारण

वसंत भोसले कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय म्हणजे कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटा-तटाचे, कुरघोड्यांचे राजकारण अनेक दशके चालत आले आहे. देश किंवा राज्य पातळीवर कोणत्याही राजकीय प्रवाहाने कॉँग्रेसच्या वर्चस्वाला आजवर आव्हान दिलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी संस्थांच्या पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची एकहाती सत्ता कायम आहे. सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र त्याला अपवाद ठरू लागल्या आहेत. या दोन्ही मित्र पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आले आहे, असे म्हणण्यापेक्षा या पक्षांनीच ते ओढवून घेतले आहे. भारतीय जनता पक्ष ही नवी ताकद गावपातळीवरील राजकारणात उदयास येऊ पाहत आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा संपणार तर आहेच, पण दक्षिण महाराष्ट्र एक नवे राजकीय वळण घेणार आहे. कोल्हापूरची जिल्हा परिषद कायमच कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. सातारा आणि सांगलीच्या जिल्हा परिषदा त्यांच्या स्थापनेपासून कॉँग्रेसकडे होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून त्या या पक्षाकडे बहुमतासह आहेत. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतपत ताकद कोणत्याही राजकीय पक्षात नाही. त्यामुळेच या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या सदस्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदांच्या इतिहासात भाजपला प्रवेश करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याचा अपवाद वगळता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत भाजपने मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने आव्हान उभे केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी केंद्र तसेच राज्यातून सत्तेवरून फेकली गेली असतानाही गटबाजीची ईर्षा करण्याची मस्ती अजूनही करीत आहे. याला कंटाळून दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या फळीतील असंख्य कार्यकर्ते, नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. सांगलीची भाजपची टीम म्हणजे कालची राष्ट्रवादी कॉँग्रेसची फळीच आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची नवी फळी बहुतांश कॉँग्रेसची नेतेमंडळी आहेत. साताऱ्यातही काही प्रमाणात असेच घडले आहे. अशाही परिस्थितीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला राज्यातील स्पर्धक गावा-गावांत आला असतानाही नेत्यांची अंतर्गत भांडणाची हौस काही संपली नाही. परिणामी या तिन्ही जिल्ह्यांतील राजकारण दोन्ही कॉँग्रेसच्या भोवती फिरते, त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्याच्या परिणामी, अजितदादा पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, सतेज डी. पाटील, हसन मुश्रीफ, आदींची अप्रतिष्ठाच होणार आहे. एकही पक्ष एकसंघपणे निवडणूक लढवीत नाही. सर्वच जिल्ह्यांत या पक्षांना गटबाजीने पोखरले आहे. याचा लाभ उठवीत भाजपने आव्हान निर्माण करण्याचे अवसान आणले आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास एकहाती सत्ता कॉँग्रेस पक्षाकडे आहे; पण जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी मंत्री आ. सतेज पाटील यांच्यात संघर्ष आहे. पी. एन. पाटील यांचे जवळचे संबंध भाजपला सक्रिय मदत करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी आहेत. त्यावरून सतेज पाटील यांच्याशी संघर्ष होतो आहे. परिणामी, अनेक तालुक्यांत कॉँग्रेसला उमेदवारही मिळालेले नाहीत. सत्तारूढ पक्षाची ही दयनीय अवस्था केवळ गटबाजीमुळे झाली आहे.