- विशाल सोनटक्केनांदेड : मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत असताना शनिवारी येथील जिल्हा बँक निवडणुकीत त्याला मुहूर्त मिळाला. दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्र आल्याने भाजपाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून दूर व्हावे लागले़ जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुकाही दोन्ही काँग्रेसने आता एकत्रित लढण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे़बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांची निवड झाली़ भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर दिनकर दहिफळे यांना ११ मते मिळाली़ एकुण २१ संचालकांमध्ये काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे ८, भाजपाचे ४, शिवसेनेचे ३ व एक अपक्षाचा समावेश आहे़महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवित सेना-भाजपाला धोबीपछाड दिली़ तेव्हापासूनच जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलेले आहे़ किनवट पालिका निवडणुकही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढवावी, असा पक्षश्रेष्ठींचा विचार होता़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आ़ प्रदीप नाईक यांच्यात प्राथमिक चर्चाही झाली होती़ मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळ आजमाविण्याचा होता़ निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजनाचा नेमका फायदा भाजपाने उचलला़ नगराध्यक्षासह नऊ जागा जिंकत किनवट पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला़ पालिकेतून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर जावे लागले़ काँग्रेसचे हातही तेथे रिकामेच राहिले़अशोक चव्हाण, अजित पवार बोलणी निर्णायकगुरुवारी सायंकाळी अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दूरध्वनीवर निर्णायक चर्चा होऊन जिल्हा बँकेत एकत्रित येण्याचे निश्चित करण्यात आले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडमधून येणार एकत्र; जिल्हा बँक निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:19 AM