मुंबई: कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थचक्रावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची बिकट परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका होताना दिसत आहे. आताही काँग्रेसनेपंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. (congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp)
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केली असून, यानुसार भारताचा जीडीपी उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधानांची तुलना हिटलरशी बरोबर नाही
कांही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते १००% बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे.
“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन
...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल
रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी
दरम्यान, केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात, तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोप करत १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आतापर्यंत किती पुरवठा झाला. कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.