मुंडेंबाबत फुंडकर यांचा गौप्यस्फोट : विधान परिषदेत अश्रुपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या मोबदल्यात गोपीनाथ मुंडे यांना केंद्रामध्ये दोन आणि महाराष्ट्रात दोन मंत्रिपदे देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली, असा गौप्यस्फोट भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी आज विधान परिषदेत केला.
मुंडे यांनी राज्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव आज विधान परिषदेत मांडण्यात आला. त्यावर बोलताना फुंडकर यांनी हा गौप्यस्फोट केला. आपली सारी फलटण घेऊन जाऊ, असे मुंडे म्हणाले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ‘गुलाल’ लावत भगव्यासोबत राहण्यास सांगितले. त्यांनी ते मानले. मीही त्यांना रोखले. मात्र, नंतरही पक्षात अनेक अपमानाचे प्रसंग त्यांच्यावर आले. तेव्हा ते म्हणायचे बघ तूच रोखलस. हा अपमान पाहण्यासाठीच रोखलस का, असा सवाल ते करायचे, असेही फुंडकर यांनी सांगितले.
अन् सदस्य रडले
फुंडकर बोलत असताना त्यांना अश्रू आवरणो कठीण झाले. आपल्याला त्यांच्यामुळेच सन्मान मिळाला, असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणावेळी सभागृहात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनीही अश्रूंना वाट करून दिली.
संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, मुंडे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे. उपेक्षित वर्गासाठी काम करणा:या या नेत्याच्या मृत्यूमुळे शोषित समाजाला जबरदस्त धक्का बसला आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह दिवाकर रावते, रामदास कदम, भाऊसाहेब फुंडकर, नीलम गो:हे, शोभाताई फडणवीस, भाई गिरकर यांनी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली. तसे पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविणार असल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
विधानसभाही गहिवरली
मुंबई : ‘काय केली चूक आम्ही
कशाची दिली सजा
बुध्दीबळाच्या पटावरती
राजाच झाला वजा’
-भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शुक्रवारी संपूर्ण विधानसभेला गहिवरून आले. अनेक सदस्यांनी अश्रूंना वाट करून दिली. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला आणि सभागृहाने तो एकमताने मंजूर केला.
वरील चारोळी सांगून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांपैकी मुंडे हे एक लोकनेते होते. मी मतांचं राजकारण करीत नाही तर मनांचं राजकारण करतो. अशी शिकवण देणा:या गोपीनाथजींकडे पाहून मी शिकलो, घडलो.
प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना देशाच्या राजकारणात काम करण्याची फार मोठी संधी मिळाली, त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आल्यावर ते खूपच आनंदी होते. मी आमदार असताना कायदा व सुव्यवस्था यावर सभागृहात केलेले भाषण ऐकून गृहमंत्नी असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी भेटण्यास बोलाविले. त्या भेटीपासून झालेली माझी मैत्नी आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकली. एक हरहुन्नरी नेता हरपला. भावना व्यक्त करता येतात पण वाटून घेता येत नाही.
अन् खडसे यांना
रडू कोसळले
त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. पक्षाच्या बैठकांमध्ये अनेकदा मी त्यांच्याशी कठोरपणो बोलत असे. प्रत्येक बैठकीनंतर ते म्हणत, ‘आता तुही मला बोलायला लागला’. मग मी दिलगिरी व्यक्त करत असे ते पण मग माङो बोलणो मनावर घेत नसत, असे सांगताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना रडू कोसळले.
आम्ही पोरके झालो..
मंगळवारी सकाळी मुंडेसर गेल्याची दु:खद बातमी समजली. दिवसभर फक्त बातम्या ऐकत होते. बघत होते. मन सुन्न झाले होते. कोणत्याच भावना मनात स्थिरावत नव्हत्या. मुंडे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना मी त्यांची जनसंपर्क अधिकारी होते. दोन वर्षे आम्ही बरोबर काम केले. त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळाले. एकदा कुठल्यातरी महत्त्वाच्या बैठकीला जायचे होते. मुंडे साहेबांना नेहमीच बैठकीला जायला उशीर व्हायचा. हे लक्षात घेऊन मी ‘सर बैठकीला जायचे आहे,’ असे सांगितले.
41क् मिनिटांनी ते बाहेर आले. सहाव्या मजल्यावरच्या त्यांच्या दालनाच्या बाहेर एक मोठे अभ्यागत कक्ष होते. ते कक्षात शिरले. तिथे 1क्क् - 125 लोक होते. साहेब प्रत्येकाशी बोलत होते. त्यांची निवेदने स्वीकारत होते. 1क् मिनिटांनी मी त्यांना निघण्याची आठवण केली. तरीही ते लोकांशी बोलत होते. इकडे उशीर होत होता. मी पुन्हा त्यांना आठवण केली. त्यावर ते शांतपणो मला म्हणाले, ‘ताई, हे लोक मला भेटायला आले आहेत.
4जर मी आज त्यांना भेटलो नाही तर त्यांना उद्या परत यावे लागेल. त्यांना तुमच्या-माङयासारखे मलबार हिलला राहण्यासाठी घर नाही. इतकेच काय तर त्यांना संध्याकाळच्या जेवणाचीही भ्रांत असेल.’ मी स्तिमित झाले. लोकांसाठी काम करणारा नेता मला त्यांच्या ठायी दिसला. माध्यमांनी त्यांना दिलेला लेट लतीफ हा किताब खुल्या दिलाने स्वीकारून ते लोकांसाठी काम करत राहिले.
4एकदा ऑफिसमध्ये काम करत असताना मला त्रस झाला. जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हे समजल्यावर ते सर्व बैठकी थांबवून तडक जेजे रुग्णालयात आले. माझी चौकशी केली. ‘काय झाले आहे?’ हे विचारल्यावर मी म्हटले, ‘रक्तदाब वाढला आहे.’ तेव्हा ‘तुम्हाला काय त्रस आहे? घरी आहे की, ऑफिसमध्ये आहे? मला सांगा. मी संबंधितांशी बोलतो.’
4कायम दुस:यांची चिंता करणारा, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा हा माणूस खरोखर लोकनेता होता. यश आणि अपयशाची पर्वा न बाळगता ते कायम मोठी स्वप्न बघत राहिले. जेव्हा स्वप्नपूर्तीचा योग आला तेव्हा काळानेच त्यांच्यावर घाला घातला.
4सर, कायम लोकांचा विचार करताना तुम्ही उशीर झाला तरी त्याची पर्वा केली नाही. पण आज सगळा महाराष्ट्र आपल्या स्वागतासाठी आसुसलेला असताना मात्र जाण्याची घाई केलीत. सर, कदाचित इथल्या जनतेच्या प्रेमापेक्षा आपले परममित्र विलासराव देशमुख आणि प्रमोद महाजनांची हाक आपल्या हृदयार्पयत पोहोचली असावी. सर, फार लवकर गेलात. महाराष्ट्राला पोरके करून गेलात. पंकजाबरोबर आम्ही पोरके झालो आहोत. - श्रद्धा बेलसरे-खारकर