शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

काँग्रेसने अल्पसंख्याकांची केवळ ठेकेदारी केली!

By admin | Published: September 12, 2016 2:32 AM

स्वबळावर लढण्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांचे संकेत.

अकोला, दि. ११ : काँग्रेसने अल्पसंख्याकांची केवळ ठेकेदारी केली आहे. काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. कॉग्रेसचनेच राष्ट्रवादीचे सर्वार्धिक नुकसान केले काँग्रेस पक्षाचा आतापयर्ंतचा हा कटू अनुभव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी आतापासूनच कामाला लागावे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.महेश भवनात खा. पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना खा. पटेल पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपणच अल्यसंख्याकाचे कैवारी असल्याच्या अविर्भावात आहे. काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.राट्रवादी कॉग्रेसला विदर्भात भरपूर वाव आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सतत विदर्भातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहतात.कर्जमाफीपासून ते कमी व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून पवारांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. पवारांसारखे दुरदृष्टी असणारे नेतृत्व ही पक्षाची खरी ताकद असून कार्यकर्त्यांनी यामधून ऊर्जा घेऊन काम केल्यास त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. सत्ताधारी भाजपवर टीका करताना खा. पटेल म्हणाले की, भाजपने केवळ मतदारांना भूलथापा देऊन सत्ता मिळविली. कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात कुठेच रस्ते नाही. विरोधी पक्षात असताना शेतमालासाठी अनेक आंदोलन करणारे देवेंद्र फडणवीस आता शेतमालांचे भाव वाढविण्यास तयार नाहीत. ह्यचाय पे चर्चाह्ण, ह्यमन की बातह्ण करण्यापलीकडे भाजप पोहोचले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांपासून स्वतंत्र विदर्भापर्यंत दिलेली भाजपची आश्‍वासने फोल ठरली आहेत. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी आता नागपुरात राष्ट्रवादीचे कार्यालय उघडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेते नितीन गडकरी विदर्भाचे असतानाही यांनी काय विकास केला, याचे उत्तर द्यावे, असा प्रश्नही त्यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष अजय तापडिया आणि जिल्हाध्यक्ष विजय देशमुख केले. जिल्हय़ाची माहिती त्यांनी येथे सांगितली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे, डॉ. आशाताई मिरगे, पद्माताई अहेरकर, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, चंद्रकांत ठाकरे, अतुल लोंढे, श्रीकांत पिसे, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, राजू मूलचंदानी, सरफराज खान, बुडन गाडेकर, दिलीप देशमुख, अनिल मालगे, अली सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मंदाताई देशमुख यांनी मानले.*वीज बिलात ग्राहकांची लूट !वीजेचे दर २.६४ रुपये युनिट असताना ग्राहकांना दहा रुपये युनिटप्रमाणे विक्री सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती शंभर डॉलरने कमी झालेल्या असतानाही ग्राहकांसाठी दर कमी झालेले नाही. आघाडी शासनाने २ लाख कोटींचा तोटा सहन केला; मात्र सामान्य जनतेवर भुर्दंड येऊ दिला नाही; मात्र हे सरकार नागरिकांच्या खिशातून २ लाख कोटींचा नफा कमावित आहे.*पृथ्वीराज चव्हाणांनी राकाँची बदनामी केली!राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ह्यखुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबेह्ण अशा पद्धतीची काँग्रेसची राकाँसोबत खेळी राहीली, अशा शब्दात खा. प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर शरसंधान साधवले.