शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून राज्यभरात ‘डॉ. आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन, शाहांच्या हकालपट्टीची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:34 IST

Congress News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा आणि अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. 

मुंबई - राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा आणि अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. 

लातूरमध्ये माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांदेडमध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. 

चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी आमदर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती मधील मोर्चात जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला. 

अकोला महानगर काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अमित शहा यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, अशोक अमानकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनेही अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड बाबासाहेब भोंडे, प्रा. संतोष आंबेकर, गणेशराव पाटील, शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पालघरमध्ये काँग्रेसनेही डॉ, बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने अमित शाह व भाजपाविरोधात सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. जालनामध्ये शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व मा. आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र