पुणे : सत्तेसाठी शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा मुद्दा साेडला असल्याची टीका सातत्याने हाेत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी माेठे विधान केले आहे. काॅंग्रेस पक्ष सुद्धा हिंदुत्वावादी असून महात्मा गांधी आणि लाेकमान्य टिळक हे सुद्धा हिंदुत्ववादी हाेते असे वक्तव्य राऊत यांनी केले.
पुण्यात आयाेजित लाेकमत पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. या कार्यक्रमात संजय राऊत यांच्या विशेष मुलाखतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात त्यांनी विविध प्रश्नांवर सडेताेड उत्तरे दिली. जेव्हा राऊत यांना हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, काॅंग्रेस सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे. महत्मा गांधी, लाेकमान्य टिळक हिंदुत्ववादी हाेते. आपला देश धर्मावर चालत नाही. नाहीतर आपल्या देशाचा पाकीस्तान हाेईल. देश संविधानावर चालताे. हिंदुत्व आमची श्रद्धा आहे. राहुल गांधी जानवं दाखवतात, गोत्र सांगतात, देवळात जातात हा हिंदुत्वाचा संस्कार आहे. इंदिरा गांधी पुजाअर्चा करत हाेत्या. पंडित नेहरु कडवड हिंदुत्ववादी हाेते.
शिवसेना साेडून इतर पक्ष हिंदुत्ववादी नाही असे मानन्याचे कारण नाही. या देशातील प्रत्येक व्यक्ती जन्माने नसेल परुतु कर्माने हिंदू आहे. आम्ही भाजपाला मागणी करताेय वीर सावरकरांना भारतरत्न द्या. अजून ताे देण्यात आलेला नाही. राजकारणात धर्म आणू नका असे बाळासाहेबांनी सुद्धा सांगितले हाेते. पाेटाला जात आणि धर्म नसताे. सेक्युलर या शब्दाला संविधानात महत्त्व आहे. ज्याने त्याने आपआपले विचार पाळावेत. आम्ही सत्तेसाठी आमची भूमिका कधीच साेडली नाही. असेही राऊत यावेळी म्हणाले.