'हिंगणघाटच्या आरोपीला हैदराबादसारखी शिक्षा करा', प्रणिती शिंदेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:37 PM2020-02-06T15:37:56+5:302020-02-06T16:03:09+5:30

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

congress praniti shinde reaction on Hinganghat Woman Ablaze | 'हिंगणघाटच्या आरोपीला हैदराबादसारखी शिक्षा करा', प्रणिती शिंदेंचा संताप

'हिंगणघाटच्या आरोपीला हैदराबादसारखी शिक्षा करा', प्रणिती शिंदेंचा संताप

Next

मुंबई - हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले आहेत. महाविद्यालयीन तरुणी, स्त्रिया यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपीला हैदराबादसारखी काहीतरी शिक्षा द्या असं म्हटलं आहे. 

'पीडित तरुणीला 90 दिवसांत न्याय मिळावा. वर्ध्यातील आरोपीला हैदराबादसारखी काहीतरी शिक्षा करा' असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. प्रशासन व घरच्यांनी पीडितेच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिले पाहिजे असं देखील प्रणिती यांनी म्हटलं आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, पीडितेला व तिच्या कुटुंबियांना  न्याय मिळावा या मागण्यांकरिता वर्धा शहरात गुरुवारी (6 फेब्रुवारी) वर्धा बंद तसेच भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या करिता वर्धा जिल्ह्यातील समस्त राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतला. 

हिंगणघाट पीडितेला सरकारने मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. 'माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या 24 वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. 

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी सोमवारी (3 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तरुणीला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 'जालन्याची घटना ताजी असतानाचं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलाय ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे. राज्यात कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघताना दिसताहेत' असं ट्विट त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या 

अनेक ट्युबलाईट यांच्यासारख्या आहेत; नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिला 'करंट'

EXCLUSIVE : वरवरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्या पैशांवरून पत्रव्यवहार; धक्कादायक उल्लेख

डोनाल्ड ट्रम्प निर्दोष, महाभियोग खटल्यातून सुखरुप सुटणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष 

हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान 

 

Web Title: congress praniti shinde reaction on Hinganghat Woman Ablaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.