“पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:03 PM2024-04-24T17:03:41+5:302024-04-24T17:04:09+5:30
Congress Prithviraj Chavan: भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Congress Prithviraj Chavan: ही लढाई देशात मोदींचे सरकार आणायचे की नाही, देशाच्या लोकशाहीला , संविधानाला काय धोका आहे. अशा स्वरूपाची लढाई झाली आहे. अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींच्या कालखंडामध्ये देशाची अवस्था मंदावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हट्टामुळे नोटबंदी आणली आणि त्याचे परिणाम लघु उद्योगावर झाले. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. देश चालवायला पैसे नाहीत, कर्ज काढूनही भागत नाही, असे आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच प्रणिती शिंदे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. सोलापुरात विकास काम केलेली आहेत, असे नमूद केले. वंचितमुळे गेल्यावेळेस सोलापूरची जागा गेली. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे. भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो
अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो. मोदींनी आणि कंपन्या विकण्याचा घाट घातला आहे. मोदी जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती पाडत आहेत. देशाच्या लोकशाहीला आणि संविधनाला धोका आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून भाजपाचे धाबे दणाणले आहे. काँग्रेसवर बोलताना मोदींची जीभ घसरत आहे वाटेल ते आरोप करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे जुनी प्रकरणे उकरून काढत आहेत, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, मोदींनी अनेक आश्वासन दिली. दोन कोटी पेक्षा २० कोटी लोकांना रोजगार दिला असता तर बेरोजगारी कमी झाली असती. पंधरा लाखाचे आम्ही काय गंभीर घेतले नाही मात्र लोकांनी गंभीर घेतले आणि त्यांना निवडून दिले. मनमोहन सिंग यांच्याबाबत जे वक्तव्य करतात ते मोदींना शोभत नाही. मोदी सांगतात पाचवी अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था वंचितांनी गरिबांनी एकत्र येऊन तयार केली आहे. आपला देश मोठा झाला आहे. पण नागरिक श्रीमंत झालेला नाही. तुम्हाला जर समृद्ध राष्ट्र व्हायचे असेल तर साडेतेरा लाख दरडोई उत्पन्न झाले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.