Prithviraj Chavan : "मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब"; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:01 PM2022-07-01T17:01:05+5:302022-07-01T17:14:29+5:30

Congress Prithviraj Chavan And BJP Devendra Fadnavis : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून भाजपा आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Congress Prithviraj Chavan tweet Over BJP and Devendra Fadnavis | Prithviraj Chavan : "मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब"; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

Prithviraj Chavan : "मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब"; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

googlenewsNext

मुंबई - एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पण भाजपाचे वरच्या फळीत नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि समर्पण म्हटले. असे असले तरी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीसांसह अनेक बडे अनुपस्थित असल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपाकडून मुंबई कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयात चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. यावरून आता काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे. 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Prithviraj Chavan) यांनी यावरून भाजपा आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुंबईच्या भाजपाच्या कार्यालयात लग्नसोहळा, पण नवरदेव गायब" असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजपातील आमदारांचा एक मोठा गट फडणवीसांबाबतच्या निर्णयावर खूश नसल्याचे दिसले. देवेंद्र फडणवीस हे देखील पदाची शपथ घेताना फारसे खूश नव्हते असे त्यांचा चेहराच सांगून गेला. अशा परिस्थितीत आज भाजपाकडून सत्तास्थापनेचा विजयोत्सव मुंबईच्या प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यात राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांसारखे नेते अनुपस्थित असल्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला.

मुंबई भाजपा कार्यालयात सत्तास्थापनेचा जल्लोष सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचा कट-आऊट हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता हा त्यागासाठी नेहमीच लक्षात राहिल असे ते म्हणाले. तसेच, मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल आणि घराणेशाहीचे राज्य संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. 

भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी, 'विधानसभा तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है', अशा घोषणाही दिल्या. यावेळी 'पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढते जाना' असे फलक घेऊन कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मानत सर्वोच्च पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले याचे साऱ्यांनीच कौतुक केले.
 

Web Title: Congress Prithviraj Chavan tweet Over BJP and Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.