महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:36 IST2024-12-24T16:35:19+5:302024-12-24T16:36:28+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. यावर आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे.

Congress raises questions on Maharashtra elections, Election Commission responds to allegations | महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीवर शंका व्यक्त केली होती. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून ५० जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून काँग्रेसला ६६ पानांचे सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, ५० विधानसभेच्या जागांवर जुलै ते नोव्हेंबर ५० हजार मतदार जोडण्याचा काँग्रेसचा आरोप तथ्यात्मक स्वरुपात चुकीचा आहे. असं काहीही झालेले नाही. आम्ही प्रत्येक सीटचे तपशील तपासले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदारांची भर पडली, मात्र ती केवळ ६ विधानसभा जागांवर जोडली गेली.

"एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी"; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल!

मतदान कमी असूनही जास्त दाखवले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदारांच्या संख्येत बदल होत आहेत, अचानक जास्त मतदान होताना दिसत आहे. याचा पुरावा देताना काँग्रेसने म्हटले होते की, संध्याकाळी ६ वाजता मतदान झाल्यानंतर मतदानाचे प्रमाण काही वेगळे असल्याचे सांगितले जाते आणि नंतर मतदान ४ ते ५ टक्क्यांनी वाढल्याचे दाखवले जाते. यावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिले आहे. आयोगाने म्हटले की, मतदारांच्या संख्येत बदल होणे अशक्य आहे. कारण मतदानाच्या समाप्तीच्या वेळी मतदानाच्या टक्केवारीचा डेटा उमेदवाराच्या एजंटकडे फॉर्म 17C मध्ये नोंदवलेला असतो. काँग्रेसला हवे असल्यास ते पाहू शकते.

काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले

काँग्रेसने जुलै ते नोव्हेंबर दरम्यान ५० मतदारसंघात ५० हजार मतदार जोडले होते असा दावा केला होता.  त्यांचे म्हणणे असे होते की, या ५० जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ४७ जागांवर निवडणूक जिंकली कारण मतदानाचा खेळ खेळला. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक दाव्याला उत्तर दिले आहे.

यापूर्वी काँग्रेसनेही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्वनांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांवर १४४० VVPAT स्लिपची मोजणी करण्यात आली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी स्लिपच्या मोजणीत कोणतीही अनियमितता आढळली नाही. म्हणजे सर्व ईव्हीएम बरोबर होत्या.

Web Title: Congress raises questions on Maharashtra elections, Election Commission responds to allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.