“भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:32 PM2024-09-04T17:32:54+5:302024-09-04T17:34:39+5:30

Congress Ramesh Chennithala News: लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

congress ramesh chennithala slams mahayuti govt over law and order situation in state | “भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला

“भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, अशी घणाघाती टीका प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पुणे शहर आय. टी. राजधानी आहे पण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण बनले आहे,याचा आय. टी. कंपन्यांना फटका बसत आहे. आतापर्यंत १२० मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.    

पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केले जात आहेत. सरकार व पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिपाई या सर्व पदांची पैसे घेऊन पोस्टिंग केली जात आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीच पोस्टींग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

दरम्यान, राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पूर्व विदर्भात धान, कापसाचे पिक वाया गेले. आता मराठवाडा व विदर्भातील काही भागातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली पण मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात मदत काही पोहचत नाही. एमपीएससीच्या मुलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने अद्याप केलेली नाही. ससून रुग्णालयासमोरची रस्ते विकास महामंडळाची सव्वादोन एकर जागा कवडीमोल भावाने दिली आहे. या जागेवर कॅन्सर हॉस्पिटल होणार होते, ५०० कोटी रुपये बाजार भाव असलेली ही जागा ९० वर्षांच्या लिजवर ७० कोटी रुपयांना दिली आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला.
 

Web Title: congress ramesh chennithala slams mahayuti govt over law and order situation in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.