"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:43 PM2020-08-25T15:43:03+5:302020-08-25T15:48:21+5:30

भाजपाच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजपा गद्दार असल्याची घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

congress sachin sawant slams bjp maharashtra over use camscanner | "गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

Next

मुंबई - मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चीनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. मात्र त्यानंतर आता भाजपाकडून या बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपचा वापर होत असल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. 

भाजपाच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजपा गद्दार असल्याची घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्र भाजपाने जारी केलेलं एक प्रसिद्ध पत्रक सावंत यांनी ट्विट केलं असून हे पत्रक बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपच्या यादीत असणाऱ्या कॅमस्कॅनने स्कॅन केलेलं आहे. भाजपाने प्रसारमाध्यांसाठी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीसाठी करण्यात आलेल्या नियुक्ती संदर्भातील यादी जारी केली. या यादीच्या खाली कॅमस्कॅनचा लोगो दिसत आहे.  

"जाहीर निषेध! गद्दार महाराष्ट्र भाजपा मोदी सरकारने बंदी घातलेले कॅमस्कॅनर अ‍ॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चीनी अ‍ॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे" असं म्हणत सचिन सावंत यांनी कॅमस्कॅनने शेअर केलेली यादीचे फोटो ट्विट केले आहेत. मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या अ‍ॅप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भाजपा बंदी घातलेली चीनी अ‍ॅप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी अ‍ॅप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे असं देखील म्हटलं आहे. 

"चीनने आगळीक करत भारताच्या सीमेत घुसखोरी करुन 20 भारतीय सैनिकांची हत्या केली त्यावेळी देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत असताना काहीतरी कारवाई केल्याचे भासवण्यासाठी चीनी कंपन्यांच्या 59 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यामध्ये कॅमस्कॅनर (CamScanner) या अ‍ॅपचाही समावेश आहे. परंतु महाराष्ट्र भाजपा आजही हे अ‍ॅप वापरत आहे. कालच (दि. 24 ऑगस्ट 2020) जारी केलेल्या एका प्रेस नोटसाठी त्यांनी बंदी घातलेल्या कॅमस्कॅनर या अ‍ॅपचा वापर केलेला आहे. मोदी सरकारने बंदी घातलेली असतानाही अशी अ‍ॅप्स वापरणारे महाराष्ट्र भाजपा हे भारतात नाही का? का त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे? असे सवाल उपस्थित करुन चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोदी सरकार निर्णय आणि 'आत्मनिर्भर अभियान' हे सुद्धा धुळफेकच आहे. स्वतः खोट्या राष्ट्रप्रेमाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्यांना मात्र देशद्रोही ठरवायचा भाजपा व त्यांच्या परिवारातील संघटनांचा उद्योग सुरुच असतो. मात्र त्यांचे हे राष्ट्रप्रेम बनावटी असून त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे" असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

चीनने सीमेवर आगळीक केल्यानंतर देशभरातील संतापाचे भांडवल करत भाजपा व त्यांच्या समर्थक संघटनांना राष्ट्रप्रेमाची भरती आली होती. चीनी कंपन्यांचे कोणतेही साहित्य खरेदी करू नये, 'बॅन चायना' या कॅम्पेनमध्ये हेच ‘तथाकथीत राष्ट्रप्रेमी’ लोक होते. विशेष म्हणजे बंदी घातलेले चीनी ‘टिकटॉक’ हे आपल्या खास उद्योगपती मित्राला मिळावे यासाठी धडपड कोण करत होते, हेही काही लपून राहिलेले नाही, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल

थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा

लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे

Web Title: congress sachin sawant slams bjp maharashtra over use camscanner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.