"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 03:00 PM2020-09-10T15:00:12+5:302020-09-10T15:08:54+5:30
काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली. याच दरम्यान काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. "कोणी पूर्वीचा अट्टल ड्रग अॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतंय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतंय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भाजपा समर्थन करते?, तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपचेच आहेत असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच "काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोही भाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!" असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे. तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2020
सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनी एक ट्विट केलं होतं. 'भाजपाचं तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर करण्याचं पाप भाजपाला खूप महागात पडणार आहे,' असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता कंगणावरून भाजपावर निशाणा साधला आहे.
काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोहीभाजप ला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2020
कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा डिवचले
कंगनाने मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले होते. त्यानंतर बुधवारी रात्री कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मला समोरून नोटिस देण्याची आणि समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही, असा टोला कंगना राणौत हिने लगावला आहे. कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
"मोदीजींचा जनविरोधी 'डिझास्टर प्लॅन', असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला"https://t.co/ct9ITmuviX#RahulGandhi#Congress#NarendraModi#BJPpic.twitter.com/BCbERzyuPn
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2020
आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल
महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलिवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.
"मोदी सरकारच्या नीतींमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या"https://t.co/QoYpY7c9sQ#RahulGandhi#Congress#NarendraModi#bjpgovtpic.twitter.com/0h7kelX0tc
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नोकरी गेल्याने दाम्पत्याची आत्महत्या
"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल
CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी