Sachin Sawant : "ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र, भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचाय"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:57 AM2022-07-31T11:57:05+5:302022-07-31T12:10:04+5:30
Congress Sachin Sawant Slams BJP Over Sanjay Raut : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढू लागला असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले आहेत. पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी २० जुलैला नंतर २७ जुलैला ईडीने समन्य बजावले होते. यानंतर आता संजय राऊतांच्या (Shivsena Sanjay Raut) चौकशीवरून काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे.
"ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र, भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचाय" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपात गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. संजय राऊत यांच्या पाठीशी उभे आहोत. जनतेचा लढा आहे, लढत राहू!" असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपात गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. @rautsanjay61 यांच्या पाठीशी उभे आहोत. जनतेचा लढा आहे, लढत राहू!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 31, 2022
"संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नाही मग ५५ लाख रुपये परत का केले?"
भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?" असा खोचक सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर (Shivsena Sanjay Raut) निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही.... ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत" असं म्हटलं आहे.
"भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा हो, पण भगवा झेंडा नाचवू नका तिथे. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल" असंही म्हटलं आहे. "कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?" असा सवाल देखील अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.