Sachin Sawant : "कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 02:17 PM2023-02-12T14:17:20+5:302023-02-12T14:29:44+5:30
Congress Sachin Sawant And Bhagat Singh Koshyari : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला आहे.
भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. याच दरम्यान आता यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता" असं म्हणत टीका केली आहे.
"एक अकेला सबपे भारी" म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यासोबतच कोश्यारीजींना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!" असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
१/४ गेल्या ९ वर्षांत देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारने नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रचंड कमी करणारी होती.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 12, 2023
तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता.
"गेल्या ९ वर्षांत देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारने नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रचंड कमी करणारी होती. तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता. अनेक राज्यपाल आले पण अशा पध्दतीने जनतेच्या तिरस्काराचे धनी कोणाला व्हावे लागले नाही. जनतेने नाकारून ही व कोश्यारीजींनी मागणी करुनही भाजपा त्यांना हटवत नव्हती हा महाराष्ट्राचा अनादर होता. "एक अकेला सबपे भारी" म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले"
"जनमताचा रेट्यासमोर अनेक हुकुमशाह्या कोलमडून पडल्या आहेत आणि जनतेचा रेटा वाढत चालला आहे हे लक्षात ठेवा. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार अनेक संविधानिक संस्थांचे व भाजपा नेत्यांचे नैतिक अधःपतन करवत आहे. येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही. कोश्यारींचे पदावरून जाणे हे त्यांच्यासाठीही योग्य आहे. सातत्याने भाजपाच्या सांगण्यानुसार विरोधकांना छळणे व मर्यादा ओलांढण्याऐवजी आता ते स्वतःला नैतिक कामात गुंतवू शकतील. कोश्यारीजींना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!" असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"