नागपूर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. प्रभावती ओझा या गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना उपचारार्थ वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपरादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा काँग्रेसचे प्रदेश सचिव रामकिशन ओझा, मुलगी लता शर्मा, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘प्रभा सदन’ १७, गिरीपेठ येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाट येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रभावती ओझा यांनी कॉटन रिसर्च इस्ट्यिूटच्या संचालक, नारियल बोर्डच्या संचालक, ज्यूट कार्पोरेशन संचालक यासह काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य, हिमाचल प्रदेशसह विविध राज्यात पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम केले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:34 PM