“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:51 PM2023-10-19T18:51:32+5:302023-10-19T18:52:09+5:30

लोकसभेत पराभव झाला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

congress senior leader prithviraj chavan said bjp should lose election of lok sabha 2024 | “ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan: देशभरातील अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अनेकविध कारवाया केल्या जात आहेत. विरोधकांकडून या कारवायांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे सरकार घालवले पाहिजे, असे म्हटले आहे. 

ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचे असेल, तर भाजपचे सरकार घालवले पाहिजे. त्याची सुरुवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, जागावाटपावरून महाविकास आघाडीत अलबेल आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू

इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस शरद पवार गटासह काही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू. आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. त्यामुळे थोडी वादावादी होईल, असे सूचक विधानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

दरम्यान, ललित पाटील प्रकरणी बोलताना, तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आले. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. कारण, यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

Web Title: congress senior leader prithviraj chavan said bjp should lose election of lok sabha 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.