शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास शिवसेनेचा नकार

By admin | Published: August 02, 2016 6:09 PM

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना विरोधकांसोबत हातमिळवणी करतीये का असं वाटत असतानाच शिवसेनेने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना विरोधकांसोबत हातमिळवणी करतीये का असं वाटत असतानाच शिवसेनेने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. अखंड महाराष्ट्राबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये असं ठणकावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावर शिवसेना समाधानी असल्याची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण आलं होतं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र आघाडीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 
 
अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे, मात्र त्याबाबत अजिबात तडजोड करणार नाही, असंही एकनाथ शिंदे बोलले आहेत.
 
मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करुन चर्चादेखील केली होती. फोनवर झालेल्या चर्चेनुसार वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री  थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली. त्यामुळे शिवसेना भाजपाची कोंडी करण्यासाठी नवी खेळी करणार अशी शक्यता व्यक्त होत होती.