शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

निवडणुकीसाठी काँग्रेसचा ‘एकला चलो’चा नारा!

By admin | Published: October 26, 2016 4:56 AM

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करायची मनापासून इच्छा नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत अजमावले असता

- मनोहर कुंभेजकर,  मुंबईआगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करायची मनापासून इच्छा नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत अजमावले असता, त्यांनासुद्धा एनसीपीबरोबर आघाडी नको आहे. पक्षश्रेष्ठींना ही भूमिका कळवली आहे. तथापि, युतीबाबत पक्षश्रेष्ठी योग्य काय तो निर्णय घेतील, असे ठाम प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये बोलताना केले. निरुपम पुढे म्हणाले, १९९५-९६ मध्ये काँग्रेसचे महापौर रा. ता. कदम होते. त्यानंतर काँग्रेसची सत्ता उलथवून १९९६ साली युतीचे महापौर शिवसेनेचे मिलिंद वैद्य निवडून आले. १९९६ नंतर गेली २० वर्षे सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजपा युतीला यंदा काँग्रेस पक्ष धूळ चारणार आहे. आगामी महापौर काँग्रेसचाच व्हावा, हे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काँग्रेस झटून काम करणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची प्रचार यंत्रणा, गेल्या २३ वर्षांतील शिवसेना-भाजपाचा कारभार आणि काँग्रेसचा मुंबईकरांसाठी वचननामा, काँग्रेसची उमेदवार निवडीबाबत भूमिका याबाबत त्यांनी आपली मते मांडली.

पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती कशी असेल?- मुंबई महानगरपालिकेत १९९६ नंतर सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपाने मुंबईची पूर्ण वाताहत केली आहे. मुंबईकरांना पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, कचरा या सुविधा देण्यात पालिकेतील शिवसेना-भाजपा युती संपूर्णपणे अपयशी ठरली आहे. युतीच्या विरोधात काँग्रेस पक्ष प्रहार करणार आहे. युतीचे रस्ते, नालेसफाई, टॅब घोटाळे काँग्रेस सत्तेत आल्यावर बाहेर काढू, त्यांची पूर्ण चौकशी करू.

मुंबईतील खड्डे आणि पाणीप्रश्नाबद्दल काय सांगाल?- पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिलेली खड्डे बुजवण्याची डेडलाइन कधीच संपली. गणपती, नवरात्र संपले आता दिवाळी जवळ आली तरी खड्ड्यांमधून मुंबईकरांची सुटका नाही. झोपडपट्टीवासीयांना जेमतेम अर्धा तास पिण्याचे पाणी मिळते. मुंबई महानगरपालिकेचा नवीन पाण्याच्या जोडणीचा दर १२०० रुपये असताना झोपडपट्टीवासीयांना प्लंबरला २० ते ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत.

डम्पिंग ग्राउंड आणि कचऱ्याचा प्रश्नही भीषण आहे...- नक्कीच. दरवर्षी कचऱ्यासाठी २००० कोटी रुपये खर्च करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची कचरा व्यवस्थापन पद्धतच चुकीची आहे. ठिकठिकाणी कचरा पूर्णपणे उचलला जात नाही. देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता २००० सालीच संपली. येथे १८ ते २० मजली इमारतीच्या उंचीचे कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. २०१६ सालातही येथे कचरा टाकला जात आहे. कचऱ्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. जगात इतरत्र वापरली जात असलेली ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची पद्धतच आपल्याकडे नाही.

हॉस्पिटल्समधील सुविधांबाबत काय सांगाल?- मुंबईतील हॉस्पिटलचा कारभार देखील ‘रामभरोसे’ चालला आहे. सामान्य मुंबईकरांना जास्त पैसे देऊन खासगीहॉस्पिटलमध्ये जावे लागते. दरवर्षी आरोग्यावर २३०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा पैसा जातो तरी कुठे?

शिक्षणासाठी पालिकेचे धोरण पुरेसे आहे?- पालिका शिक्षणासाठी सुमारे ३४०० कोटी रुपये वर्षाला खर्च करते. मात्र आज मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत. पालिकेच्या शाळांच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली असून इमारती पडत आहे. शाळेत इंटरनेट नाही. विद्यार्थ्यांना दिलेले टॅब चालत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे मूळ धोरणातच आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

सत्तेत आल्यावर काय कराल? - काँग्रेस पक्ष मुंबईत सत्तेवर आल्यावर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सुविधा देण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण असेल. मुंबईकरांना आठवड्यातील ७ दिवस प्रत्येक घरांत मोफत नळजोडणी देऊ. २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. युतीच्या काळातील मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या टँकर आणि प्लंबर लॉबीतून मुंबईकरांची मुक्तता करणे, दर्जेदार आरोग्य आणि शिक्षण सुविधा देणार, खड्डेमुक्त कचरामुक्त मुंबई, दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यावर आमचा भर असेल.

तिकीटवाटप कसे असेल?- काँग्रेसमधील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन जिल्हास्तरावर माजी खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार व विभागातील नेते यांच्या समितीतून आलेल्या उमेदवारांच्या नावांच्या सूचनेचा विचार करण्यात येईल. एका विभागात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्यास त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. शिवसेना-भाजपा युतीला पराभूत करण्याचे आमचे ध्येय आहे.