शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

"फडणवीसजी, ...तर महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल" - काँग्रेसचा सल्ला

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 28, 2020 4:47 PM

पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. 

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे, तसेच हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भात भाष्य करणारे, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आहे. आता ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूसोबत दिसणार आहेत. पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. 

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल."

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे. ते आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यांच्याकडून हे नाकारले जात होते. पण आता जदयूत प्रवेश केल्याने ते निवडणूक लढतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वीही गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.

जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांकडून पटनामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्या आदेशानंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी या पथकातील आयपीएस विनय तिवारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता. तसेच सुशांत प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करावे यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केले.

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

गृहमंत्री अनिल देशमुखांनीही गुप्तेश्वर पांडे यांच्यावर साधला होता निशाणा -बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते असा टोला त्यांनी लगावला होता.  

आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट