- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापणार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांचीच सत्ता पुन्हा येणार, हे स्पष्ट झाले. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा वारू काँग्रेसने रोखला. भाजपाला १३ जागा मिळाल्या. तर ताराराणी आघाडीने १९ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले. कोल्हापुरात शिवसेनेचा अक्षरश: धुव्वा उडाला. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर तर भाजपा व ताराराणी आघाडीने युती केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने होणारी ही निवडणूक असल्याने विधानसभेवेळचे लोकमानस तसेच कायम आहे का, याचीही चाचणी म्हणून या लढतीकडे पाहिले जात होते. भाजपकडे स्वपक्षाच्या उमेदवारांची वानवा होती; त्याचाही फटका भाजपला बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा जागा मिळाल्या; परंतु गेल्यावेळपेक्षा अकरा ठिकाणी अपयश आले. ताराराणी आघाडीला २० जागा मिळाल्या. या निवडणुकीत शिवसेनेची मात्र बेअब्रू झाली.‘ताराराणी’ची राष्ट्रवादीला आॅफरकोल्हापुरात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ताराराणी आघाडीने दाखविली आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ताराराणी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ताराराणी’चे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून तशी आॅफर दिली आहे. पक्षीय बलाबलकोल्हापूर२०१०२०१५भाजपा०३१३ताराराणी-१९शिवसेना०४०४काँग्रेस३१२७राष्ट्रवादी२५१५अपक्ष ०९०३शाहु आ. ०१-जनसुराज्य ०४-एकूण७७८१