प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 01:34 AM2020-12-15T01:34:39+5:302020-12-15T01:35:00+5:30

१९९९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यसमितीने जाहीर केलेला आणि थेट सोनिया गांधी यांनी नक्की केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गायब करण्याची खेळी झाली.

congress state president himself fielded the party's official candidate | प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले

प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले

Next

मुंबई : राजकारणात डावपेच आणि शहकाटशह चालूच असतात. निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म लांबविण्याच्या घटनाही समोर येत असतात. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यसमितीने जाहीर केलेला आणि थेट सोनिया गांधी यांनी नक्की केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गायब करण्याची खेळी झाली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीच सोमवारी विधान परिषदेत याचा खुलासा केला. तेही राजीव आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले गेलेल्या दिवंगत राम प्रधान यांचाच दाखला देत.

दिवंगत राम प्रधान यांच्यासह विनायक पाटील आणि संदेश कोंडविलकर यांच्या निधनाबद्दल आज विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडला गेला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी आदरांजलीपर भाषणे केली. यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी हा खुलासा केला. यासाठी राम प्रधान यांच्या ‘माय डेज् विथ राजीव अँड सोनिया’ या पुस्तकातील परिच्छेदच वाचून दाखविला. यात राम प्रधान म्हणतात, १९९९च्या सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ आल्या तसे मी महाराष्ट्रात अधिक लक्ष्य केंद्रित केले. काँग्रेसच्या विधानसभा तिकीटवाटपात चार वेळा मला हस्तक्षेप करावा लागला. यातील दोन उमेदवार मुंबईतील तर पुणे आणि कोल्हापुरातील एक एक उमेदवार होता. लायक असलेल्या उमेदवारांनाच तिकीटवाटप व्हावे, असे सोनियांना कळवावे लागले. 

Web Title: congress state president himself fielded the party's official candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.