शांतता, सलोख्यासाठी काँग्रेसचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 06:54 AM2018-04-09T06:54:32+5:302018-04-09T06:54:32+5:30
भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे.
मुंबई : भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. मुंबईत सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ पक्षातर्फे सामूहिक उपवास कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.
भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. मी स्वत: परभणी येथे उपोषणाला बसणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी आज सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ, महापालिका मुख्यालयासमोर, सामूहिक उपवास कार्यक्रमाचे मुंबई काँग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सामूहिक उपवास कार्यक्रमास आपण आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन संजय निरुपम यांनी केलं आहे.
भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या दि. ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. मी स्वत: परभणी येथे उपोषणाला बसणार आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 8, 2018