बुलडाणा: पेट्रोल, डिझेलची झालेली प्रचंड दरवाढ त्यानंतर जिवनावश्यक वस्तुच्या भाववाढी नंतर आता गॅसच्या दरवाढीचे संकेत केंद्र सरकारने देवून महागाई वाढविण्याचा सपाटा लावला आहे. या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून या महागाईच्या विरोधात काँग्रेसने रविवारी मोटार सायकली लोटत नेत केंद्र सरकारच निषेध केला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेसच्या विविध संघटनाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.महागाई कमी करू या आश्वासनावर केंद्रात सत्तेवार आलेल्या मोदी सरकारने महागाई कमी करण्या ऐवजी जिवनावश्यक वस्तुची मोठय़ा प्रमाणवार भावावाढ केल्याने सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रस प्रथम रस्त्यावर उतरली. व शहरातून मोटार सायकली ढकलत मोर्चा काढला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सकाळी या मोर्चाला हीरवी झेंडी दिली. संगम चौक., जयस्तंभ चौक., स्टेटबँक चौक, तहसिल चौक मार्गे हा मोटार सायकली ढकलत मोर्चाचे संगम चौकात विसर्जन झाले. मोर्चा दरम्याने केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संजय राठोड, मिनलताई आंबेकर, पं.स.सभापती निसार चौधरी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल सपकाळ, डॉ.मधुसूदन सावळे, हारून मास्टर, पुरूषोत्तम देवकर, समाधान हेलोडे, जि.प.सदस्य वाघ, अशोकभैय्या जैस्वाल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश दळवी, नगर सेवक राजीव काटीकर, जाकीर कुरेशी, सतिष मेहेंद्रे, विनोद बेंडवाल, सौ.प्रमिला गवई, विमल सावळे, दिनकर ढोमणे, सज्जु अन्सारी, गणेश जाधव, गोपालसिंग राजपूत, अमोल पवार, शैलेश खेडेकर, रहीम शेख, सै.आशिफ, इरफान शेख, सोनु जाधव, प्रशांत जाधव, योगेश इशपुते, स्वप्निल भोंडे राजीव पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेसचे वाहन लोटत आंदोलन
By admin | Published: July 06, 2014 10:42 PM