“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 12:37 PM2024-05-05T12:37:06+5:302024-05-05T12:39:29+5:30

Congress Vijay Wadettiwar News: पंतप्रधान घाबरले आहेत म्हणून त्यांच्या भाषणात काँग्रेसचे नाव २५ वेळा येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

congress vijay wadettiwar criticized bjp and pm modi govt in lok sabha election 2024 | “सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

Congress Vijay Wadettiwar News: सांगलीत विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत, विदर्भातीस १० पैकी १० जागा महाविकास आघाडी जिंकेल. नितीन गडकरी निवडणुकीत पराभूत होत आहेत. महाराष्ट्रात एकतर्फी ही निवडनुक होताना दिसत आहे. किमान ३८ जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. देशात सत्तांतर होणार जुमलेबाज, तानाशाही सारकार सत्तेतून घालवण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. जुमलेबाजी फार दिवस चालणार नाही. देशाचे पंतप्रधान काँग्रेसच्या नावाने बोंबा मारत सुटलेले आहेत. पंतप्रधान घाबरले आहेत म्हणून त्यांच्या भाषणात काँग्रेसचे नाव २५ वेळा येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

शाहू महाराजांचे विचार संपवण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात

मुख्यमंत्री कोल्हापुरात चार-चार दिवस मुक्कामाला असतात. शाहू महाराजांचे विचार संपवण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात मुक्काम करत आहेत.  पण त्याचा काहीही फरक पडणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांची भीती पंतप्रधान यांच्या मनात बसली आहे. एका मताने तीन लोकांचा बंदोबस्त करायचं लोकांनी ठरवले आहे. पंतप्रधान मोदी याच्या काळात अनेक हल्ले झाले, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी कधी आणि कुठे हल्ले झाले, याची तपशीलवार माहिती वाचून दाखवली. २०१४ ला विकासाच्या नावाने मते मागितली. २०१९ ला शाहिदाच्या नावाने मते मागितली. आता राम राम करण्याची वेळ येते, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.
 

Web Title: congress vijay wadettiwar criticized bjp and pm modi govt in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.