“‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी”; काँग्रेसची महायुती सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:30 PM2023-09-18T15:30:04+5:302023-09-18T15:30:15+5:30

Maharashtra Politics: सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

congress vijay wadettiwar criticized shinde fadnavis and pawar mahayuti govt about mitra | “‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी”; काँग्रेसची महायुती सरकारवर टीका

“‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी”; काँग्रेसची महायुती सरकारवर टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून समाज आक्रमक झाल्याचे दिसत असून, दुसरीकडे विविध मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. यातून सरकारवर निशाणा साधला. 

राज्य सरकारकडून निती आयोगाच्या धर्तीवर 'मित्र' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडल्यामुळे हे कार्यालय निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं असून या कार्यालयाच्या भाड्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून वर्षाकाठी २ कोटी ५६ लाख रूपये देण्यात येणार असल्याचा आरोप राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही नवीन स्कीम 

मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन  करण्यात आलेल्या ‘मित्र‘ संस्थेचे  कार्यालय नरिमन पॉइंट येथील निर्मल भवन या इमारतीमध्ये  स्थानांतरित केले आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. मित्र संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास करणे हा 'मित्र'च्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 


 

Web Title: congress vijay wadettiwar criticized shinde fadnavis and pawar mahayuti govt about mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.