शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

“राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 3:46 PM

Congress Vijay Wadettiwar News: अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून, राज्यात हजारो  हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

हवामान खात्याचा हा अंदाज आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला. राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरे अतिवृष्टीमुळे  जलमय झाली

वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरे अतिवृष्टीमुळे  जलमय झाली आहेत. या मोठ्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतीमधील नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था सुरक्षितस्थळी करण्यात यावी. विदर्भातील चंद्रूपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तेथे नागरिकांना मदत करावी. नागरिकांनी  जीव  धोक्यात घालून घराबाहेर पडू नये. नद्या, नाले, ओढे, धबधबे, धरण, दरडप्रवण क्षेत्र, घाट, पूरप्रवण क्षेत्र, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन विजय वेडेट्टीवार यांनी केले.

दरम्यान, अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली शहरांना पुराचा धोका होऊ नये यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसRainपाऊस