सांगलीतील लोकांना बदल हवा आहे. सांगलीत विद्यमान खासदारांविरोधात लोकांमध्ये खदखद आहे. काल दिल्लीत वरिष्ठांची चर्चा झाली. ती काय झाली हे मला माहिती आहे. विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत असा सवाल करत राऊतांनी त्यांचे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, असे म्हणत विमाने भरकटतात, असा टोला लगावला आहे.
सांगलीतील उमेदवारीवरून राऊतांनी काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. भाजपाने लोकांच्या मनातील धनुष्य बाण चिन्ह नष्ट करण्याचे ठरविले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा उमेदवार ठाणे कल्याण आणि डोंबिवली मतदार संघात जिंकतोय. तिथे भाजप शिंदे गटाची बी टीम आहे, त्यांना काही अस्तित्व नाही. भाजप शिंदे गटाला काही मतदारसंघात धनुष्यबाण वापरायला देत नाहीय. कोकणासह अनेक मतदार संघात आम्ही चाळीस चाळीस पन्नास वर्ष धनुष्य बाणावर लढलो होतो असा आरोप राऊत यांनी केला आहे.
तसेच आमच्यातील सगळे वसुलीवाले लोक भाजप मध्ये गेले आहेत. भाजपचे वसुली रॅकेट सुरु आहे. राष्ट्रवादीत रॅकेट चालवणारे सगळे भाजपमध्ये गेले. यासाठी आम्ही भाजपाचे आभार मानतो. त्यात ईडी आणि सीबीआय सगळे भाजपचे लोकं आहेत. आठ हजार कोटी रुपये जे भाजपच्या निधीमध्ये गेले ते या वसूली रॅकेट मधून आले होते, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. जर त्यांचे उपचार नागपूर मध्ये होत नसतील तर उपचार ठाण्यात करू, किंवा मुंबईत करू, असा चिमटाही राऊत यांनी काढला.