ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - परवा झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांची म्हणजे काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले होते, मात्र ते साफ खोटे आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कोणतेही मते फुटली नाहीत असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केला. याचवेळी राज्यातील भाजप सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच असल्याचेही टीका शिंदे यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सोलापूर शहरातील नागरी समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष होत आहे. आम्ही सत्तेवर असताना हेच ओरडा करायचे, आता घाण पाणी येते, रस्ते, ड्रेनेज स्मस्याबद्दल सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. आम्ही सपोर्ट केला म्हणून बजेट झाले असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
यावेळी सुधीर खरटमल, हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदधिकारीही उपस्थित होते. येत्या काही दिवसात सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची व हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून सूत्रे हाती येणार असल्याचे संकेत शिंदे यांनी यावेळी दिले.