महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक गुरुवारी मुंबईत होत असतानाच १८ जागा लढवण्यावर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून त्यातील काही नावेही बाहेर आली आहेत. गुरुवारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी मविआची बैठक होत असून यावेळी पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलावण्यात येणार आहे की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ते सोबत आले नाहीत तर कोणाला उमेदवारी द्यायची, याबद्दलही काँग्रेसने चर्चा केली आहे. ज्या ३ जागांवरून घोडे अडले होते, त्यापैकी सांगली, भिवंडीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे समजते.
हे आहेत संभाव्य उमेदवार गडचिराेली नामदेव किरसानचंद्रपूर विजय वडेट्टीवारनागपूर विकास ठाकरेरामटेक रश्मी बर्वेअमरावती बळवंत वानखेडेअकोला प्रकाश आंबेडकर अथवा अभय पाटीलकाेल्हापूर छत्रपती शाहू महाराजसोलापूर प्रणिती शिंदे पुणे रवींद्र धंगेकरनांदेड वसंत चव्हाणलातूर शिवाजी काळगेनंदुरबार गोवाल पाडवीभंडारा-गोंदिया नाना पटोलेभिवंडी दयानंद चोरगेसांगली विशाल पाटील