काँग्रेस मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार, शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:01 PM2023-03-30T19:01:46+5:302023-03-30T19:03:59+5:30

Congress: अदानीच्या उद्योगात २० हजार कोटी रुपये कुठून आले? राहुल गांधी हाच मुद्दा घेऊन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. काँग्रेसने मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी ३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा आयोजित केल्या आहेत.

Congress will expose the corrupt alliance of Modi-Adani, press conferences of Congress leaders in all districts of the state on Friday | काँग्रेस मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार, शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदा

काँग्रेस मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार, शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदा

googlenewsNext

मुंबई -  मोदी-अदानीची भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला घातला असून सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही कारभार सुरु आहे. अदानीच्या उद्योगात २० हजार कोटी रुपये कुठून आले? राहुल गांधी हाच मुद्दा घेऊन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. काँग्रेस पक्षाने मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी २९ तारखेला देशभर पत्रकार परिषदा घेतल्या आणि उद्या दिनांक ३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाणे येथे, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी तर पृथ्वीराज चव्हाण पुणे शहरात पत्रकार परिषदांना संबोधित करतील. माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते, आमदार, खासदार व प्रमुख नेते राज्यातील इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करतील.

अदानी सुमहात २० हजार कोटी रुपये कुठुन आले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी ही मुख्य मागणी आहे पण मोदी सरकार या चौकशीला घाबरत आहे. मोदी सरकारला थेट जाब विचारणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करुन सरकारी घर खाली करण्याची नोटीसही मोदी सरकारने बजावली आहे. या हुकुमशाहीचा पर्दापाश या पत्रकार परिषदेत केला जाईल.

Web Title: Congress will expose the corrupt alliance of Modi-Adani, press conferences of Congress leaders in all districts of the state on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.